न सांगता

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ९ ऑगस्ट २०१७

न सांगता - मराठी कविता | Na Sangata - Marathi Kavita

ती म्हणाली...
न सांगता कधी वाटे कळावे
न सांगता जाणुनी तू घ्यावे
न बोलता न सांगता गुंज ऐकावे मनाचे
आनंद द्यावा कधी न सांगता

मी...
न सांगताच तुझाच झालो
न सांगताच तुझ्याचसाठी आलो
न सांगताच प्रेम निस्वार्थ घेऊन आलो
न सांगताच प्रेमात तुझ्या बहरू लागलो

न सांगताच मैत्री करीत राहिलो
न सांगताच मैत्रीसाठी झूरू लागलो
न सांगताच मैत्रीची माळ गुंफत राहिलो
न सांगताच मैत्रीच्या नाजूक क्षणांना फुलासारखा जपत राहिलो

न सांगताच स्वप्न तुझे पाहत राहिलो
न सांगताच स्वप्नात तुझ्या येत राहिलो
न सांगताच तुझ्या माझ्या भेटी वाढल्या
बघता बघता शिखरा एवढ्या आठवणी साठल्या
अन आठवणी त्या प्रेमाला आपल्या सजवू लागल्या

न कळावे हृदयस्पंदने हि तुझ्याच स्पर्शाने का वाढावे
जवळीक साधता तुझ्या एका मिठीची
वेड दोघांत का लागावे

प्रेम असे कसे हे अवघड
तरीही दोघे एकमेकांवर करू लागलो
न सांगताच मनाला आपल्या
दोघे एकमेकांत गुंतू लागलो

न सांगताच तुझ्या मनाला समजू लागलो
प्रेम आहे तुझे अफाट माझ्यावर
ते अनुभवू लागलो

खरंच सांगतो
न सांगता मी तुझ्या प्रेमासाठी
देवाकडे भांडू लागलो

न सांगताच असे हे सतत
मनाला पोखरून का जावे
प्रेम केले वेड्यासारखे हे
न सांगता तुला अन मलाच कळावे

अखेर प्रेमाचा काय असावा हे
मीच रंगवू लागलो
न सांगताच माझ्या नशिबाला
मीच सतत कोसू लागलो
न सांगताच माझ्या मनाला मीच समजवू लागलो
न सांगताच माझ्या मनाला मीच समजवूलागलो

  • TAG