मी आहे एक गाय

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ डिसेंबर २०१७

मी आहे एक गाय  - मराठी कविता | Mi Aahe Ek Gaay - Marathi Kavita

मी आहे एक गाय
माझ्या वासर्‍याची माय
पाप भोगते मी आज
मी केले तरी काय?

रस्त्यावरून फिरतानां सुध्दा
मला असुरक्षितता वाटते
कधी मोठा ट्रक येऊन मला चिरडून
टाकेल याची मलाच कल्पना नसते

अरे, जसे कोण्या गुंड्यांनी गुन्हा
केल्यावर पोलिस नेतात त्यांना पकडून
तसे हे राक्षसी माणसं नेतात
आम्हाला कत्तलखान्याला गाडीत डांबून

कसाई करतो माझी हत्या
आचारी देतो माझी मेजवानी
लोक खातात मजेत दस नंबर म्हणूनी
माणसा हीच तर माझी दुःखी कहाणी

आम्हालाही जगण्याचा हक्क असतो
हे माणूस कधीचाच विसरला आहे
अशी वेळ सुध्दा नक्की येईल
जेव्हा माणूस माणसालाच खाणार आहे

  • TAG