MarathiMati.com - Android App on Google Play Store

मी खूप दमलोय

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० एप्रिल २००५

मी खूप दमलोय - मराठी कविता | Me Khup Damloy - Marathi Kavita

मी खूप दमलोय
कोणी तरी मला सुखाची गोष्ट सांगा. मला मान्य आहे.
ह्या शहराचा नागरीक म्हणून
तुम्ही बहाल केलीय ही दमछाक.
पण मी विश्रांती घेतो सिग्नल जवळ
काही सेकंद. त्याचीही नोंद होतेय तुमच्या मोबाईलवर
हे तितकेसे अन्यायकारक आहे माझ्यावर
मी यानाने अवकाशात गेलो तर
मला विश्रांती मिळेल का?
अंगावरचे कपडे उतरवले त्र
मला मोकळं वाटेल का?
मी इतका खचलोय तरी मला
झोप का येत नाही?
कृपया कोणीतरई मला सुखाची गोष्ट सांगा?
लहानपणी दुःखाची गोष्ट ऐकली म्हणून
धावलो पाटी फुटेस्तोवर अक्षरांच्या मागे
म्हणून मी दमलो असेन. आता संपूर्ण कोसळून
पडण्यापूर्वी येऊ दे वारा तुमच्या पिचक्य स्ट्रॉ मधून भसाभसा
भिरभिरू दे नात्यानात्यांची पवनचक्की
शक्य तेवढ्या जोमात.
फ्रंटवर घासू दे बेडक माझी छाती प्रिय शत्रूंसाठी
जमल्यास रेस्ट हाऊसमध्ये लावा
माझा फोटो, घाम निपटतानाचा.
तुमच्या जगण्याचे निकषच किती खरे.
तुम्हाला टिव्हीवरच्या टापांचे आवाज ऐकून धापा लागतात आणि मी तर कवितेच्या
कुसाखालीच उभा आहे.
आता तरी मला सुखाची गोष्ट सांगा?
शेवटची म्हणून का होईना, सांगाल ना?

MarathiMati.com - Android App on Google Play Store