पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

मी अंधश्रद्धेचा चोर

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ मार्च २०१५

मी अंधश्रद्धेचा चोर - मराठी कविता | Me Andhashraddhecha Chor - Marathi Kavita

ढोंगी साधूच्या अंज्ञानाची
गळ्यात घाली दोरी
मनात आले त्याला पूजितो
मी अंधश्रद्धेचा चोर॥१॥

मांजर आडवे गेल्या समजतो
नुकसान होईल घोर
मनात आले त्याला पूजितो
मी अंधश्रद्धेचा चोर॥२॥

दृष्ट झाली मीठ मिरची उतरीवतो
समोर आणून पोरं
मनात आले त्याला पूजितो
मी अंधश्रद्धेचा चोर॥३॥

नवस केल्या बोकड कापितो
होऊन पापीखोर
मनात आले त्याला पूजितो
मी अंधश्रद्धेचा चोर॥४॥

मंदिर दिसले हात जोडितो
करून भक्तोचा शोर
मनात आले त्याला पूजितो
मी अंधश्रद्धेचा चोर॥५॥

Book Home in Konkan