मंत्राग्नि

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ फेब्रुवारी २०१७

मंत्राग्नि - मराठी कविता | Mantragni - Marathi Kavita

मोकळ्या श्वासात माझ्या आगळा मंत्राग्नि तो
भास तो आभास अविरत खंड निरवी भ्रांति तो

आदी मी विश्वास माझे वादळे स्वर्गांती ती
पामरे विकलांग वेशी वावरी नवभावी की

विश्वमग्नी बुद्ध मी पण तुंबती जीव प्रश्नकोटी
भावना मनकामना मन श्रावणी जलबिंदू दाटी

रणांगे ती घट्ट म्याने आश्रिता समशेरी त्या
सर्वकाळी रोष सांगे कथा सरला शांतीच्या

घाव शत हृदयात माझ्या कृष्णारुधिरा तेवढी
मृत्यू राहे शांत पडघम जीवाची उघडे घडी

  • TAG