मन भरता भरत नाही

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ फेब्रुवारी २०१८

मन भरता भरत नाही - मराठी कविता | Mann Bharata Bharat Nahi - Marathi Kavita

आठवण तुझी अशी की सरता सरत नाही
साठवून हे मन भरता भरत नाही

चिंब पावसात मन भिजता भिजत नाही
जोवर नजरेत तू दिसता दिसत नाही

ओठी हसू माझ्या खुलता खुलत नाही
तुझ्या सहवासात मग तेच हटता हटत नाही

हातातला हात तुझा सुटता सुटत नाही
भेटीतला जिव्हाळा मिटता मिटत नाही

दृष्टीत तू माझ्या राहता राहा असा की
ओढ तुझी हि घटता घटत नाही

  • TAG