मनमोर
अनामिक तृप्तीने
आनंदला मनमोर
फुलविले पिसाऱ्यास
आनंदे नाचण्यास
नाचला धुंद होऊनी
अन् दुसऱ्याच क्षणी...
पिसाऱ्याच्या असंख्य डोळ्यांनी
जे दिसले मन्मनी...
मनमोराचा आनंद लोपला
भीतीनं तो घाबरला
पिसारा फुललेला
नकळत मिटला
मनमोराचा कंठ
दाटून आला
मूक रुदनाने
डोळे भरले
भरल्या डोळ्याने
पायाकडे पाहिले
खेदाने हसला
हेच जगाचे खरे रूप!