मांजरीची पावलं

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ सप्टेंबर २००८

मांजरीची पावलं - मराठी कविता | Manjarichi Pavala - Marathi Kavita

मांजरीची पावलं तुझी
सारं सांगून गेली
चोर पावलांची खूण
मनी रूजून बसली
प्रेमाच्या विचारांचं गुंतवळ
सुटता सुटेना
मांजराचं डोळे मिटणं
खरंच समजेना
मांजर पावलांनीच
याचं कोड उलगडलं
मनीचं मांजर
मनातच घुटमळलं
मग याद आली
तुझ्या मांजर नख्यांची
डोळे मिटून
कानोसा घेण्याची
ओरखडा तर,
काढणार नाहीस ना!
मांजर डोळ्यांची साथ
जन्मभर देशील ना!