मनाच्या तळाशी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० एप्रिल २००५

मनाच्या तळाशी - मराठी कविता | Manachya Talashi - Marathi Kavita

मनाच्या तळाशी
एक राजा एक राणी
तवंग आईचा
मुलगी उताणी

मनाच्या तळाशी
साचत राहते
आई आंबट
मुलगी खारट
राजा राणी
तिरकस तुरट

मनाच्या तळाशी
आई गायब
आटल्या दुधावर
राणी नायक

करपट नातं
जोजवत राहतो
राजा आपला उशाशी
मेल्या मनाच्या तळाशी