मनाच्या खोल दरीत

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ ऑक्टोबर २०१४

मनाच्या खोल दरीत - मराठी कविता | Manachya Khol Darit - Marathi Kavita

फार गर्दी आहे नजरेसमोर...
मी मात्र रस्त्याने चालतांना देखील बंजी जंपींग करतोय मनाच्या खोल दरीत...
चांगल्या वाईटाचा...
समतोल
नफ्या तोट्याचा...
ताळेबंद
शोध प्रतिशोधाचा...
प्रवास
मी ‘मी’चा...
शुकशुकाट
हा असा काहीसा क्रम आहे...
ह्या गर्दीसोबत चालतांना
फार, फारच गर्दी आहे नजरेसमोर...
मी मात्र रस्त्याने चालतांना देखील बंजी जंपींग करतोय मनाच्या खोल दरीत...

  • TAG