मनाची होडी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ सप्टेंबर २०१५

मनाची होडी - मराठी कविता | Manachi Hodi - Marathi Kavita

कवी मुंबईतल्या सर ज. जी. कला कला महाविद्यालयातील माजी विद्यार्थी आहे, आपले शिक्षण पूर्ण करून महाविद्यालयातून बाहेर पडलेला हा चित्रकार कवी जेव्हा अनेक वर्षांनी पुन्हा आपल्या आठवणी जाग्या करण्यासाठी महाविद्यालयाची भेट घेतो तेव्हा त्याच्या मनात निर्माण होणारे विविध भाव आणि संवेदनांचे शब्द वर्णन करणारी कविता म्हणजे मनाची होडी. शाळा, महाविद्यालय, कला महाविद्यालय आणि विशेषतः मुंबईतील सर ज. जी. कला महाविद्यालयातील आयुष्य अनुभवलेल्या वाचक मित्रांच्या मनास ही कविता अधिकच स्पर्शुन जाईल.

मनाची होडी आज जेजेच्या बेटावर पुन्हा फिरून आली
आठवणीतल्या त्या ओल्या रंगांना अलगद स्पर्शून आली

मातीच्या त्या स्पर्शाने ती स्वतःसच आकारू पाहू लागली
मनाची ही होडी आपला मार्ग बनवू पाहू लागली

आता ह्या होडीच्या लाकडाला देखील पालवी फुटायला लागली
कारण
मनाची ही होडी आज जेजेच्या बेटावर फिरून आली