MarathiMati.com - Official WhatsApp Number

मला साळला जायाचं हाय

लेखन: स्वाती दळवी | प्रकाशन: संपादक मंडळ | २९ सप्टेंबर २००८

मला साळला जायाचं हाय - मराठी कविता | Mala Salala Jayach Haay - Marathi Kavita

मला आता साळला जायाचं हाय
शिकुण शहाण व्हायाचं हाय...
रामु झाला डाक्टर
दामु झाला हापीसर
मलाबी सायेब व्हायाचं हायं
मला आता साळला जायाचं हाय
शिकुण शहाणं व्हायाचं हाय...

इंग्रजीच पुस्तक वाचायचं हाय
मराठी कविता लिव्हायची हाय
गावाला साक्षर करायचं हाय
मला आता साळला जायाचं हाय
शिकुण शहाणं व्हायाचं हाय...

वहिणीचा मार आता थांबवायचा हाय
ताईचा हुंडाबळी रोखायचा हाय
स्त्रिला सन्मान द्यायाचा हाय
मला आता साळला जायाचं हाय
शिकुण शहाणं व्हायाचं हाय...

सावकाराचा जुलूम थांबवायचा हाय
शेतकऱ्याला मानानं जगवायचं हाय
बाबाला कर्जातून सोडवायचा हाय
मला आता साळला जायाचं हाय
शिकुण शहाणं व्हायाचं हाय...

आईला लुगडं चोळी घ्यायाची हाय
डोक्यावर छप्पर बांधायचं हाय
गावाचा विकास करायचा हाय
ज्ञानाचा प्रकाश फेकायचा हाय
मला आता साळला जायाचं हाय
शिकुण शहाणं व्हायाचं हाय...

Book Home in Konkan