माझ्यातला परमेश्वर

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ जुलै २००४

माझ्यातला परमेश्वर - मराठी कविता | Majhyatala Parmeshwar - Marathi Kavita

धमण्यांतून धावणाऱ्या तांबड्या पाण्याशी
नातं सांगणाऱ्या पांढऱ्या ऋदयाच्या गर्दिवर माझा विश्वास नाही

विश्वास आहे तो फक्त
श्‍वासांतून अंतःकरणा पर्यन्त चैतन्यरुपी संचार करणाऱ्या
माझातल्या परमेश्वरावर