पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

माझी सखी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ सप्टेंबर २०१५

माझी सखी - मराठी कविता | Majhi Sakhi - Marathi Kavita

एक दिवस अचानक भेटली अनामिक सखी
फेकून गेली तोंडावर हसू मोरपंखी

हजार प्रश्न डोळ्यात घेऊन समोर आली
उंबरठ्यावर माझ्या क्षणिक येऊन विसावली

बसतेस का अजून हिंदोळ्यावर विसरून देहभान?
अजून मोती सांडतात का तूझ्या शब्दातून छान?

ओल्या मातीचा वास अजून भारावतो का तूला?
जातेस का अजून धावत पहिल्या पावसात भिजायला?

अजून वही लिहितेस का भावलेल्या रचनांची?
का झाली होळी तूझ्या शुद्ध विचारांची?

अजून खुणावते का तूला क्षितीज आणि मृगजळ?
का सुरू झाली तुझ्या बहराची पानगळ?

अजून कधी आळवतेस का सप्तसूरांचा संध्याराग?
मिटलेल्या डोळ्यांमधे स्वप्नफुलांची केशरबाग

सांग सखे भेटशील का अशीच अधून मधून?
तूझ्यात मी अन्‌ माझ्यात तू अशाच जाऊ गुंतून

Book Home in Konkan