माझी कविता

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ डिसेंबर २०१७

माझी कविता - मराठी कविता | Majhi Kavita - Marathi Kavita

पोपट करतो मिटू - मिटू
मिरची खातो चाटू - चाटू
कावळा करतो काव - काव
म्हणतो माणसाला झाडे लाव

कोकिळ करतो कुहू - कुहू
शोधत त्याला कुठे पाहू
चिमणी करते चिव - चिव
येते मला तिची किव

मोर घेतो सुंदर तान
माझी कविता किती छान

  • TAG