माझी छकुली

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ जानेवारी २०१८

माझी छकुली - मराठी कविता | Majhi Chhakuli - Marathi Kavita

छकुली माझी का बरं रूसली
आई आली तरी नाही हासली
कोणता खाऊ देऊ बाई सांग
कोणते खेळणे हवेतरी तुला
कसा मी रूसवा घालवू तुझा
सांग तरी छकूले एकदा मला

आई, माझे बाबा कधी गं येणार
फॉरेनची बाहुली मला कधी आणणार
बाहुलीला घेवून मिरवीन मी
शेजारच्या पिंकीला दाखवीन ती
पिंकी अन्‌ मी भातुकली खेळू
तुम्हाला आम्ही जेवायला बोलवू

  • TAG