माझे हृदयस्पंदन

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ जानेवारी २०१८

माझे हृदयस्पंदन - मराठी कविता | Majhe Hrudayspandan - Marathi Kavita

हळहळते मन
क्षण क्षण व्याकूळ
दिसामाजी येत राही
तुझीच आठवण

सांज येते दाटून
ओलावले नयन
पापणी पापणीत
तुझी सय भरुन

उष्ण निःश्वास तुझे
माझ्या श्वासांतून
ओढ अनामिक
बहरते गात्रांतून

कोठे कसे आवरू
माझे हृदयस्पंदन
त्याला केवळ आकळे
तुझ्यासाठीचे आक्रंदन

तुझ्या भेटीसाठी
अधीर झाले तन मन
पैलतीरावर बोलावते
तुझ्या बासरीची धून

  • TAG