MarathiMati.com - Android App on Google Play Store

माझं मन

लेखन: स्वाती दळवी | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ सप्टेंबर २००८

माझं मन - मराठी कविता | Maajh Mann - Marathi Kavita

सगळ्यांनी समजावलं तरी मानत नाही
कितीही वाटलं तरी करवत नाही
कुणी काही सांगितलं तर ऎकवत नाही
अश्रु कितीही गाळले तरी गळतच नाही
माझं मन हे असं का ? कुणालाच कळत नाही

चटके कितीही बसले तरी ओरडत नाही
आपल्यानीच तोडलं तरी दुरावायला तयार नाही
अपेक्षेप्रमाणे सगळ्यांना एकत्र आणता येत नाही
माझं मन हे असं का ? कुणालाच उमजत नाही

निस्वार्थी कष्टाची जाणीवही कुणा नाही
निखळ प्रेमाच्या भावनेचा आदरही कुणा नाही
कितीही केलं तरी केलं कुणी म्हणतच नाही
वाटतं मी कुणाची कुणी राहिलेच नाही
कारण कुणी मला प्रेमाने आपलं म्हणतच नाही
माझं मन हे असं का ? कुणालाच समजत नाही

MarathiMati.com - Android App on Google Play Store