Download MarathiMati.com's New Android App from Google Play

लेखकाला आलेलं कुणाचंही पत्र

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० एप्रिल २००५

लेखकाला आलेलं कुणाचंही पत्र - मराठी कविता | Lekhakala Alel Kunachahi Patra - Marathi Kavita

कोणत्याही दुपारी कुणाचंही पत्र येतं रंगीत कव्हर वालं
पत्र मिळताचह त्यावर तुटून पडतात
भुकेल्या नजरेने लेखकाच्या घरातले सर्व
आहे, बहीण, बायको, काकी नी चुलतभाऊ इत्यादी.
लेखक दमून येतो पत्रासारखा प्रवासातून
तेव्हा टि. व्ही. वर आजार बळावलेल्या माणसासारखं
पडून असतं पत्र.
लेखकाच्या आधीच इतरांनी वाचून आकसून गेलेलं
असतें ते. लेखकासारखं.
आईला वाटतं, मुलाचं कौतुक दडलंय त्यात
बायकोला वाटतं, नवऱ्याचं लफडं अडलंय त्यात
बहिणीला वाटतं, किती दूरदूर आपल्या भावाचा वावर!
मुलीला वाटतं, ई हे तर रंगीत कव्हर!
काकीला वाटतं, दुपारी वाचू पडल्या पडल्या
आईला वाटतं, चेक असेल तर रेशन सुटेल वेळेला अडत्या
लेखक बिखक तसं काही नसतं घरच्यांना
थोडं समाधान हेच जोडलेलं
लेखकाच्या वाट्याला असंच येतं का सारं
त्याच्या आधी फोडलेलं?

Download MarathiMati.com's New Android App from Google Play