कोंदण

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ सप्टेंबर २००८

कोंदण - मराठी कविता | Kondan - Marathi Kavita

दुःखाच्या कणाकणानी
भारावून गेलेली मी
सुखाच्या कणात
न्हाऊन जात नाही
वेचीत बसते सुखाचे कण
दूःखाचे कोंदण ल्यालेले!
अन्‌ अचानक
सापडतो आनंदाचा डोह
कोंदणाकडं बघताना
मग वेडच लागते
सुखाचे कण शोधण्याचे
दुःखाचे कोंदण घालण्याचे
सुखाने दुःख निवळते
की, दुःखाचे सुख उजळते
याची जाणीव होत नाही
सुखदुःखाह्ची बेरीज मात्र
जीवनमूल्य उजळते