कोडे अजून उलगडत नाही

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ फेब्रुवारी २०१८

कोडे अजून उलगडत नाही - मराठी कविता | Kode Ajun Ulagadat Nahi - Marathi Kavita

बोलवत तर मी ही नाही
तरीही यायचं टाळत तोही नाही
हसू दाखवत मी नाही
भाव दाखवत तोही नाही

नजरानजर झाली जरी
वाचायचं काय मला कळतच नाही
कसे काय तो भाव वाचतो
कोडे अजून उलगडत नाही

प्रेम म्हणजे गालिचे हसू नाजूक
कि ते हृदयातील हळवी धुकधुक
मीही त्याला सांगत नाही
अन्‌ तोही अव्यक्तपणे सांगून जाई

  • TAG