Download MarathiMati.com's New Android App from Google Play

किती काळ चाललो

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० एप्रिल २००५

किती काळ चाललो - मराठी कविता | Kiti Kal Chalalo - Marathi Kavita

किती काळ चाललो तुझे बोट धरून
इतका की, तुझ्या सानिध्याच्या संधिप्रकाशात थकून गेलोय मी.
मला उमजते ते सत्य असते,
म्हणून न उमजणारं काहीही असत्य मानतो मी.
असं की,
तू साऱ्या विश्वाच्या शोकाची सुरुवात
आणि मी नकाराची भांग पचवून विश्वाला पाठमोरा
एवढ्याने तुझेमाझे प्रश्न सुटणार नाहीत.

ओढलेलं तुटू नये असं
आपण कोणतं रसायन
ह्या भाषेच्या वाळवंटात खितपत?

Download MarathiMati.com's New Android App from Google Play