पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

खोटं खोटं हसतो

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १३ ऑक्टोबर २०१५

खोटं खोटं हसतो - मराठी कविता | Khota Khota Hasato - Marathi Kavita

प्रत्येकाच्या काळजात
प्रत्येकाचा घाव
आहे कोण सुखी
दुःखाचाच जमाव
वळण थोडे वेडे
अन्‌ वाकडी इथली वाट
कोणाची ना पर्वा
आपल्याच कौतुकाचा घाट

आपला कोण कधी
जाऊन दुसर्‍याला मिळेल
माणसांची घालता सांगड
आहे कोनाचा मेळ
खेळगडी आपण सारे
तो तिकडून खेळतो खेळ
कोण सावरेल कोणाला
नाही रडायलाही वेळ

कष्ट कोण करतो
कोण मारतो मोठ्या बाता
करतो तो एकटा
मागे टोमणा येता जाता
झाकून ठेवतो आतल्या आत
जुन्या अश्रूंचा त्रास
वेळ कुठे मांडायला
रोजच्याच दुःखाची आरास

दिवस कुट्ट काळा
कधी सरूनिया जाईल
स्वप्नातला उषःकाल
कधी माझ्यासाअठी होईल
रडता रडता हसणे
अता विसरूनच जाईल

तरी रोज नव्या दिवसाची
मी वाट बघत असतो
आव्हानाच्या बिमोडाला
सावध होऊन बसतो
दुःख माझं आत
वर खोटं खोटं हसतो

Book Home in Konkan