कसे...

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ सप्टेंबर २००८

कसे... - मराठी कविता | Kase - Marathi Kavita

कसे देवू दान तुला
हात माझे रिते रे...
कसे ढाळू अश्रू तरी
नेत्र झाले कोरडे रे...
कशी काढावी समजून
ओठ माझे बंद रे...
कशी येऊ तुजसमोर
पाय साखळदंड रे...
काय बोलू तुज सवे
शब्द झाले मुके रे...