Download MarathiMati.com's New Android App from Google Play

कार्यकर्ता

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० एप्रिल २००५

कार्यकर्ता - मराठी कविता | Karyakarta - Marathi Kavita

मी कोणीच नाही आता.
म्हणजे मी पूर्वी कोणीतरई होतो.
रस्ता टापांखालचा किंवा
वारा झिंगलेला होता त्यावेळी.
पण नंतर माझा उपयोग झालाच नाही.
इथल्या कुंवार क्रांतीला
किंवा निवांत मातीला
कुठल्याही सळसळीने
मी लक्ष विचलित होऊ दिलं नाही.
एक मांजर आडवं गेलं आणि
आयुष्य मागे सरकलं तेवढंच
झाडांनी मला हात देऊ केले होते अगोदर
पण नंतर त्यांचाही बेत बदलला
मी खेचून गेलो
भाविकाने मदत नाकारलेल्या ईश्वरासारखा
पण मेलो नाही, श्वास घेत राहिलो
आता मेलोय तर
गुदमरून मेलो म्हणून
इतिहासाच्या पानांना माझ्य संदर्भाच्या उपयोग नाही
त्यांना बहुधा नुसते श्वास
हवे होते.
फुटलेल्य छातीच्या गाभाऱ्यातले.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play