Download MarathiMati.com's New Android App from Google Play

कमाल किमान तपमान

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० एप्रिल २००५

कमाल किमान तपमान - मराठी कविता | Kamal Kiman Tapman - Marathi Kavita

सर्वदायी छाती अवघी ५२ सें.मी
तर रतनकाकूची ८० आणि
सुनंदाची ८४ सेंमी.
असा कागद घरच्या शिलाई मशीनच्या
ड्रॉवरमध्ये चिमटून गेलेला
कवटाळून घेईल अशी छाती किती सेमीची
अशी टिप मारताना
मी - सुई जागेवरच तणतणत.
कमर उंची, पूर्ण उंची, मागील गळा, पुढील गळा
मी लोळागोळा
बॉबीनमधला गुंतावळा
ठळक बातम्या ऐकतानाही माझ्याच मूळव्याधीचा ध्यास मला
कमाल किमान तापमान त्या त्या दिवसापुरते
गृहित धरून
उचकटून टाकू या काम
कवटाळून किंवा टाळून
प्लीज, तू थोडा त्रास घेतल्याशिवाय
आपला संसार बिघडणार नाही, रेडिमेड लुगड्यातला.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play