काळजातून वाहणारा चेहरा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २३ जुलै २००४

काळजातून वाहणारा चेहरा - मराठी कविता | Kaljatun Vahnara Chehra - Marathi Kavita

घेवूनी मजला उशाशी हुंदका गातोय गाणी
अनवाणी आसवांतून श्वास ही गातोय गाणी

का कळेना सांग तुजला गुज माझ्या अंतरीचे
घे जरासा सोबतीला, प्राण ही गातोय गाणी

येवू दे काठावरी तू स्वप्न जे ओठांवरीचे
बिलगुनी लाटांस माझ्या काठ ही गातोय गाणी

लेवुनी जखमा सुगंधी स्वप्न सजले अंतःरीचे
श्वासन्या तुजला पुन्हा तो भास ही गातोय गाणी

तेच ते सांगु किती मी
जीर्ण या ओळींतूनी

या काळजातून वाहणारा चेहरा गातोय गाणी
घेवूनी मजला उशाशी हुंदका गातोय गाणी

अनवाणी आसवांतून श्वास ही गातोय गाणी