काव्य

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ एप्रिल २०१७

काव्य - मराठी कविता | Kaavya - Marathi Kavita

एका लिहिलेल्या ओळीच्या
शेवटाला काय लिहावे ?
भावनांचे अश्रू सारे
शब्द व्यर्थ होऊन जावे

जाणिवांची चोरदारे
त्यातून संवेदनाच यावी
एका लिहिलेल्या ओळीच्या
पुढे ओळ नवी लिहावी

कोऱ्या कागदाची व्यथा
ऐकून जराशी घ्यावी
टाकाने अश्रू ढाळावे
कविता नवी सुचावी

बोलण्यासारखे न आता
माझे काही उरावे
माझे मलाच नकळत
मी काव्य असे रचावे

  • TAG