जोगवा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ सप्टेंबर २००८

जोगवा - मराठी कविता | Jogwa - Marathi Kavita

मागितला जोगवा
करीत बाबा बाबा
पितृप्रेमाची तहन
थोडीतरी भागवा!
जोगवा घाल गं
मायेच्या माऊली
प्रेमाची साऊली
तूच माझी!
कैसा मागू तुला
जोगवा भाऊराया
तववरी माया
करावी मीच!
पतीघरी आले
सोडूनिया छत्र
जोगवा झाले...!
वृद्धत्व येताच
पुत्रापुढे हाट
पसरोनी मग
मागने जोगवा!
जीवाची तगमग
साहवे ना आता
अंतःकाळी जोगवा
मागते विठूपाशी!