झरोका

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १२ सप्टेंबर २००८

झरोका - मराठी कविता | Jharoka - Marathi Kavita

ज्या स्वप्नांच्या झरोक्यातून
पाहिलं होतं,
दिलासा देणारं रूप
आश्वासाक डोळे,
पिळदार बाहू
तो स्वप्नांचा झरोका
जपला हृदय संपुष्टात!
जीवघेण्या स्पंदनाने उघडला
तो अचानक
झरोक्यातून नाही दिसले
तुझे कोणतेच रूप
दिसली फक्त कोळीष्टकं
झरोक्यातून लोंबणारी
स्वप्नाना वेढणारी...