जगण्याची क्षमा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ सप्टेंबर २००८

जगण्याची क्षमा - मराठी कविता | Jagnyachi Kshama - Marathi Kavita

विकत मिळते । जगण्याचे छत्र
मरणंच मात्र । विनाखर्ची

पाठीवर वार । डोक्यावर भारा
पोटातला सुरा । दिल्लगीत

डोळ्यांतले पाणी । डोळ्यांत आटते
काळीज पेटते । वणव्यात

वारकरी वजा । मारेकरई जमा
जगण्याची क्षमा । दिलगिरी