जग असे कसे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ मार्च २०१८

जग असे कसे - मराठी कविता | Jag Ase Kase - Marathi Kavita

या उजेडाच्या दुनियेत
मन रमेनासे झाले
अन्‌ अंधारमय रात्री
क्षण भयाण वाटू लागले

स्वप्नांच्या दुनियेतही
जगणे कठीण होवू लागले
या उजेडाच्या दुनियेत
मन रमेनासे झाले

आकाशाकडे पाहिले तर
पायाखालील जमीन सरकण्याची भिती
जमिनीकडे पाहावे तर
आकाश निघून जाण्याची भिती

सरळ मार्गाने जावे तर
समाज डुबविण्याची भिती
अन्‌ वाकड्यात जावे तर
जीव गमवण्याची भिती

  • TAG