ईश्वराला हार आणि

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० एप्रिल २००५

ईश्वराला हार आणि - मराठी कविता | Ishwarala Har Ani - Marathi Kavita

ईश्वराला हार आणि
तुम्हाला पेढे
एवढंच मी म्हणेन.
बहीण पास झाली
हे तुम्हीच समजायचे.
शेवटचे वर्षही तिने पार केले.
बहिणीला हॉंगकॉंगला जायचे आहे
पण तिने कल्याण स्टेशन
नीट पाहिले नाही अद्याप.
तिला पायलटचा कोर्स
करायचा आहे
पण ती सायकल चालवायला घाबरते
बिनरहदारीच्या रस्त्यावर.
तिला आयुष्यात खूप खूप खूप काही
करायचे आहे.
पण ती तर नुकतीच बीए झाली आहे.
तिच्या उज्वल भवितव्यामध्ये
मी खंबीर
हातात
ईश्वराला हार आणि
तुम्हांला पेढे घेऊन.