हे सर्व का आणि कशासाठी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २३ जुलै २००४

हे सर्व का आणि कशासाठी - मराठी कविता | He Sarva Ka Ani Kashasathi - Marathi Kavita

सर्वांच्या नजरा एकवटलेल्या भुकेल्या नरभक्षकासारख्या
माझ्यावर !

आणि मी अस्तित्व पणावर लावलेल्या....
निर्भीड पण बावरलेल्या - निरागस
हरणासारखा-रानोमाळ....

अखेरचा क्षणापर्यंत
श्वासांच्या शर्यतीत जिंकण्याच्या विलक्षण ध्यासाने पेटलेलो,

मात्र..
मनाच्या खांद्यावर श्वापदांच्या सुळ्यांचे ओघळणारे रक्तरंजीत पसायदान..
नरडीचा घोट घेऊनदेखील मुठीत आवळून धरलेली क्षितीज रेघ...
आणि काहिशी संभ्रमात पडलेली..
माझी अंधुक पण स्वच्छ नजर

विचारत होती
हे सर्व का? आणि कशासाठी?

हे सर्व का?
आणि कशासाठी?