हवी हवीशी वाटणारी मैत्री

लेखन: |प्रकाशन: संपादक मंडळ| ११ एप्रिल २०१८

हवी हवीशी वाटणारी मैत्री - मराठी कविता | Havi Havishi Vatnari Maitri - Marathi Kavita

मैत्री असावी तुझी आणि माझी
एक अनामिक गोड हास्य करणारी
कधी कठिण प्रसंगी शाब्दिक धीर देणारी
तर कधी मंगल प्रसंगी प्रासंगिक कौतुक करणारी
चुक झाली तर ती चुक समजून सांगणारी
मैत्री असावी तुझी आणि माझी

आठवले ते बालपणीच्या मैत्रीतले दिवस
मित्रांचा घोळका जमून हास्य विनोदाचा कल्लोळ करताना
सवंगड्याची रीतच न्यारी
वाटे पुन्हा हवी हवीशी वाटणारी मैत्री

मित्रांचे होणारे गोड वाद पुन्हा सामंजस्याने मिटणारे
अशी मैत्री वारंवार लाभो मुखी गोडवा कायम राहो
एक मैत्री असावी तुझी आणि माझी
एक अनामिक गोड हास्य करणारी

  • TAG