हरवलेली स्वप्नं

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ सप्टेंबर २००८

हरवलेली स्वप्नं - मराठी कविता | Haravleli Swapna - Marathi Kavita

मी,
गारव्याला झाडाखाली
ती,
विस्कटलेल्या चेहर्‍याची
गालावर आसवांचे डाग
हातात टोपली...
माझ्याजवळ आली
इकडं तिकडं घोटाळली
काय हरवलं असावं?
तिचं ते धांडोळण
बघता बघता
माझी नजर
पायाकडं
बरीच चाल
चाललेले पाय
काय शोधत फिरताहेत...?
मी विचारलं
तिचं उत्तर...
हरवलेली स्वप्न!