MarathiMati.com - Android App on Google Play Store

हळूच मजला पाहशील का ?

लेखन: स्वाती दळवी | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ सप्टेंबर २००८

हळूच मजला पाहशील का ? - मराठी कविता | Haluch Majala Pahshil Ka - Marathi Kavita

प्रित फुला रे आज अवचित असा अचानक येशील का ?
लाजलाजूनी चूर होताना हळूच मजला पाहशील का ?
तुझीच वेडी धुंद होऊनी रात्र रात्र मी जागताना
इंद्रधनुचे सप्तरंग तु स्वप्नी माझ्या भरशील का ?

क्षणाक्षणाला कणाकणांमध्ये भास तुझा रे होताना
आयुष्यात माझ्या तु गंध प्रीतीचा भरशील का ?
प्रित फुला रे आज अवचित असा अचानक येशील का ?
लाजलाजूनी चूर होताना हळूच मजला पाहशील का ?

ओढ मला रे तुझी असताना सहवासाने तुझ्या
मला स्वर्गसुख तू देशील का ?
कधी अचानक पाऊस बनुनी चिंब भिजवूनी जाशील का ?
स्वप्नामधल्या स्वप्न फ़ुला रे वास्तवात तू येशील का ?
प्रित फुला रे आज अवचित असा अचानक येशील का ?
लाजलाजूनी चूर होताना हळूच मजला पाहशील का ?

तुझ्या वाचुनी जगणे माझे व्यर्थ असे रे असताना
उगाच “तिला” तू पाहशील का ?
झुरताना मी तुझ्याचसाठी तु कुणावर भाळशील का ?
साथ मी देईन तुलाच जन्मभर तुही माझाच राहशील का ?
प्रित फुला रे आज अवचित असा अचानक येशील का ?
लाजलाजूनी चूर होताना हळूच मजला पाहशील का ?

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store