Download MarathiMati.com's New Android App from Google Play

हा पाऊस

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ डिसेंबर २०१२

हा पाऊस | Ha Paaus

हा पाऊस म्हणजे थेंबातुन प्रश्नांची सरबत्ती
मी काय खुलासे करु नभाला इतकी भिजल्यावरती

मी रोज नव्याने वाचु पहाते पाण्याची अक्षरे
हा पाऊस काही नवेच लिहितो माझ्या रस्त्यावरती

ही झाडे, वेली, गवत सारी मातीची लेकरे
हा पाऊस त्यांना अपुले म्हणतो भिजुन गेल्यावरती

हे जाणवते मज पानांमधुनी बावरते हसते कुणी
या सरी नव्हे तर हस्ताच्या गोड आठवणी बरसती

हा पाऊस आणतो आभाळातुन आठवणींची चित्रे
मज वडील दिसती पाणी पाणी उपसत दारापुढती

हा पाऊस म्हणजे थेंबकळ्यांचा गुच्छ शुभ्र चंदेरी
मी काय करु या शुभ सुखाचे कोणी नसता सोबती

Download MarathiMati.com's New Android App from Google Play