गुरू ऋण

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ जानेवारी २०१८

गुरू ऋण - मराठी कविता | Guru Rhun - Marathi Kavita

साध्याश्या वेषात
उच्चकोटीचे संस्कार जपणारे गुरुवर्य
नाही बर विसरलो आम्ही शाळेला
संसाराच्या राहाटगाडग्यात अन्‌
जग राहाटीत आज ही जपलंय तुम्हाला

आज ही वाटतं
त्या पोक्त अन्‌ श्रेष्ठ खोडाना
घरी बोलावावं
साऱ्या आठवणी जागवाव्यात

कधी रागीट नजर तर कधी
संस्कारांची केलेली खैरात
सारं सारं अश्रूंनी मोकळं करावं
अन्‌ ऋण व्यक्त करावं

घ्यावा सरांना शर्ट पॅन्ट
अन छान साडी बाईला
सांगावी आपली प्रगती
अन द्याव सारं श्रेय त्यांना

घ्या वित टवटवीत फुलं
वहावीत त्यांच्या पायावर
अन्‌ छानसं पुस्तक दयावं
त्यांच्या हातावर

गुरुवर्य

असं समजू नका
आम्ही तुम्हाला नाही आठवत
सार शिकवुनही तुम्ही आहात
रिक्त
तुमच्या ऋणातून होऊत का
कधी आम्ही मुक्त...?
म्हणूनच हे गुरुऋण झालंय
व्यक्त

  • TAG