गर्भातली कळी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ मार्च २०१८

गर्भातली कळी - मराठी कविता | Garbhatali Kali - Marathi Kavita

गर्भातली मी कळी
घ्या मला जवळी
नका अशी धिक्कारु मला
जरी असेल मी मुलगी

माझीही आहे इच्छा
पोटी जन्म घ्यावा तुझ्या
पण, वंशाच्या दिव्यासाठी तुम्ही
अस्तित्वास नाकारता माझ्या!

मलाही वाटतेच ना
आईच्या कुशीत शांत निजावे
बाबांच्या मायेत छान फुलावे
आजीच्या गोष्टी ऐकाव्या
आजोबांसोबती खेळ खेळावा

पण, तुमच्या या हट्टापायी
सारी स्वप्ने माझी विस्कटली
तुमची ही सारी स्वप्ने
माझ्याच मरणास उत्कट झाली

मी मुलगी आहे
यात माझा काय गुन्हा?
की, या गर्भातल्या कळीला
न फुलताच मारता!

  • TAG