MarathiMati.com - Android App on Google Play Store

एक पिल्लू मरुन पडलेलं

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० एप्रिल २००५

एक पिल्लू मरुन पडलेलं - मराठी कविता | Ek Pillu Marun Padlela - Marathi Kavita

सकाळी उठून पाहतो तर
माझ्या अंगणात
तुरुतुरु चालणारं कवितेचं पिल्लू
मरून पडलेलं.
त्याच्य खांण्यात एखादा
विषारी शब्दाचा दाणा आला असेल!
किंवा ते कित्येक दिवसाचं उपाशीही असेल
पण इतका हळवा निष्काळजीपणा तसा घातकच.
म्हणूनच ‘बेजाबबदार कवी’ म्हणून
द्याल ती शिक्षा मला मान्य आहे.
जास्तीत जास्त तुम्ही एका छोट्या पिल्लाची
अमानुष हत्या ह्या आरोपाखाली मला
ठेचून मारू शकाल किंवा एखादं अनियतकालिक काढाल ह्या पीत्यर्थ
पण पिल्लाचई मरण एखाद्या रोगराईचा
बळी असेल तर?
तुम्हाला सावध रहायला हवं
हे तुम्हाला एवढ्यांसाठी सांगतो की,
तुमचाही एक चेहरा आहे तंतोतंत माझ्यासारखा.
कवितेला वहीच्या खुराड्यात
बंद करणाऱ्या मालकासारखा
किंवा
एखाद्या संमेलनात
श्वासासाठी वही उघडण्यापुरता

MarathiMati.com - Android App on Google Play Store