दुःख

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ सप्टेंबर २००८

दुःख - मराठी कविता | Dukkha - Marathi Kavita

बांधुनिया मनाला
दुःख मी पांघरले
आतड्याची बुजवत आग
उरी उर कवटाळले
खाऊनी लाडू भुकेचा
तहानेचा लाडू प्याले
जरी जीर्ण वस्त्र झाले
जपून जपून वापरले
टाके किती घातले
परी उसवतची गेले
ऐशाच जीर्ण वस्त्राने
दुःखास गे आधारले
बांधुनिया मनाला
मी दुःख पांघरले