डोळ्याला इजा होतात

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३१ जानेवारी २०१८

डोळ्याला इजा होतात - मराठी कविता | Dolyala Ijaa Hotat - Marathi Kavita

हृदय आणि मन एकमेकांशीच भांडतात
हे प्रेमाचे ऋतू किती लवकर संपतात
आणि
आता तुझ्याच आठवणीत अश्रूंनी डोळ्याला इजा होतात

दिवस तुझ्या आठवणीत आणि रात्र तुझ्याच स्वप्नात रमतात
मनातील भावना तुला शोधायला प्रेमाच्या शहरात निघतात
आणि
आता तुझ्याच आठवणीत अश्रूंनी डोळ्याला इजा होतात

आपले दूर रहाणेच प्रेमाची पक्की गाठ बांधतात
कविता करीत असतांना प्रेमाच्या शाहीतून तुझंच नाव निघतात
आणि
आता तुझ्याच आठवणीत अश्रूंनी डोळ्याला इजा होतात

डोळ्यातील बाहूली तुझाच चेहरा शोधतात
तुझ्या एका झलकाची डोळे मात्र वाट पाहतात
आणि
आता तुझ्याच आठवणीत अश्रूंनी डोळ्याला इजा होतात

प्रेमाचे क्षण हे प्रत्येकाच्या नशिबात का नसतात?
असतात तर मग हे क्षण दूर का जातात?
आणि
आता तुझ्याच आठवणीत अश्रूंनी डोळ्याला इजा होतात

  • TAG