Download MarathiMati.com's New Android App from Google Play

डोळीयाचा माठ

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ सप्टेंबर २००८

डोळीयाचा माठ - मराठी कविता | Doliyacha Maath - Marathi Kavita

अशी तापले तापले
सांग कशी थंडावू रे
एका एका थेंबासाठी
जीव झाला खुळा रे...
आता येरे झरझर
पाणी पाहू डोळाभर
माझी इवलीशी कूस
तुजसाठी कासावीस गर्भ कोंभाचा धरण्या
किती कराव्या मागण्या
बीज अंकुरण्या पोटी
किती करावी आटापिटी
नाही धीर धरवत
पाणावले बघ नेत्र
डोळीयाचा माठ आत
झालारे आत जड

Download MarathiMati.com's New Android App from Google Play