डोळे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ मे २०१५

डोळे - मराठी कविता | Dole - Marathi Kavita

कधी बदामी कधी गोल
कधी बोलके कधी अबोल

कधी टप्पोरे कधी पाणिदार
कधी तलवारी सारखे तिक्ष्ण धार धार

कधी नाराज कधी हासरे
कधी मादक कधी लाजरे

कधी मिश्किल कधी फितूर
कधी प्रेमळ कधी निष्ठुर

पापणीत लपलेले स्वप्नात सजलेले
अश्रुंनी भिजलेले शांत कधी निजलेले

सुंदर ते डोळे!