दिवा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० एप्रिल २००५

दिवा - मराठी कविता | Diva - Marathi Kavita

बापाने दिवा लागला तेव्हा
घर कोसळेल असं वाटलं नाही
घर कोसळले पण
बापाचे म्हणणे
दिवा लावल्यामुळे नाही.
त्याने काही कारणे पुढे केली
थातूर मातूर
- भिंतीवर खिळे अधिक होते
- पावसाच्या दिशेने घर बांधले असताना
पाऊस पडलाच नाही
- पूर्वीच्या भाडेकरूंनी जाताना
घर पोख्रले होते
- जमिनीला छताचे आकर्षण असावे
इत्यादि. इत्यादी.
हे असे असले तरी
मी कधी पाहिलेच नाही
घराला छत होते ते
आणि घरि परतलो नाही
दिवा विझण्यापूर्वी.
घर आईने सांभाळायचं म्हणून
कोसळणंही तिनेच थोपवायचं
यावर आमचं एकमत झालं
असो
कदाचित
आईच्या काळजात थोडं हललं असेल
नवऱ्याविषयी / मुलाविषयी आणि घराविषयी.