MarathiMati.com - Android App on Google Play Store

चुकत गेलंय बरंच काही

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १० सप्टेंबर २००८

चुकत गेलंय बरंच काही - मराठी कविता | Chukat Gelay Barach Kahi - Marathi Kavita

कुठं, कसं कळत नाही
चूक रक्तातली की बीजातली
नसातली मी मांसातली
कळत नाही अंतरातलळ काही
मात्र चुक्त गेलय बरंच काही
कानांनी ऐकलं नाही
डोळ्यांना दिसलं नाही
स्पर्शानं जाणवलं नाही
की कसला वास नाही
नक्कीच चकलंय काही
दगड नसताही ठेच लागली
बोच नसताही डोळ्यांत लाली
नीरव शांततेच आली बधीरता
नसता पाणी लोचनी सजलता
जाणवत राहतो चुकीचा परिणाम
सारे काही वाटते कुचकाम
काय चुकलंय कळत नाही
शिक्षा मात्र जाळत राही

MarathiMati.com - Android App on Google Play Store