चांदण्या रात्री...

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २७ सप्टेंबर २००८

चांदण्या रात्री... - मराठी कविता | Chandanya Ratri - Marathi Kavita

चांदण्या रात्री
स्वप्न बघत
तुझं माझं एक
आकाश तयार झालं...
जिवापाड जपणाच्या
सावलीचे
मेघ तयार झाले
माझं मन भारावलं...
तुझ्या बोलण्यातून
जडावलेल्या शब्दातून
माझं भारावलेपण
वाढतच गेलं
मी केव्हा मोकळी झाले
कळलंच नाही...
कळलं तेव्हा
तू होतास
एक शुष्क मेघ...
ओलावा नसलेला..
मी तशीच!
माझ्या विचारांचा ओलावा..
मेघ तयार झाला,
मेघातील तो ओलावाच
माझ्यावर बरसला...
नव जीवन देत.