बुरसटलेली पाच पावले

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ जुन २००९

बुरसटलेली पाच पावले - मराठी कविता | Bursataleli Pach Paule - Marathi Kavita

बुरसटलेली पाच पावले -

जगण्याच्या शर्यतीत कसाबसा
धावत, धडपडत, धापा टाकत...
उपांत्य फेरीत, मी!

तेवढ्यात,
पांढऱ्या गर्दीतून एक नातं आडवं गेलेलं
घाबरलेल्या अपशकूनासारखं,
आणि, आयुष्य निर्वीकारपणे माघारी
बुरसटलेल्या पाच पावलांसारखं!