बुडवण्यासाठी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ सप्टेंबर २००८

बुडवण्यासाठी - मराठी कविता | Budavnyasathi - Marathi Kavita

माणसं नाहीत
घरंही नाहीत
तिथं एक गाव आहे
कर्जाच्या अर्जावरही
गर्भातल्याचं नाव आहे

नुस्ते कागदं काळे करुन
भरावेत अर्ज
काढावेच कर्ज
बुडवण्यासाठी

देशाला बुडवतो म्हणून
आपलं काय होणार आहे
एक दिवस तरी देश पुन्हा
कुणाच्यातरी ताब्यात जाणार आहे